ऊस बिले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई : डॉ. दिनेश्वर मिश्र

सहारनपुर : उत्तर प्रदेश सरकारने सहारनपूर विभागातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २००० कोटी रुपये थकीत असल्याची गंभीर नोंद घेतली आहे. शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा देत शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे द्यावेत असे निर्देश दिले आहेत.

याबाबत युनिवार्ता डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, राज्याचे ऊस विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहारनपूर विबागात २.३८ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक ८४५ कोटी रुपये शामली कारखान्याकडे आहेत. सहारनपूरच्या कारखान्याकडे ६५६ कोटी रुपये आणि मुझफ्फरनगरातील कारखान्यांकडे ५३७ कोटी रुपये थकीत आहेत. त्यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलांचा आढावा घेतला जात आहे. बिले न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here