नुकसान झालेल्या ऊस आणि इतर पीकांचा पंचनामा करण्यात कुचराई करणाऱ्या अधिकार्‍यांविरोधात होणार कारवाई: मंत्री सतेज पाटील

165

कोल्हापूर: जिल्ह्याचे पालक मंत्री सतेज पाटील यांनी रविवारी सांगितले की, ग्रामसेवक आणि तलाठी जर पंचनामा करण्यास कुचराई करत असतील तर त्यांना कारवाईचा सामना करावा लागेल.

पाटील यांनी रविवारी चंदगड तालुक्यातील शेतांचा दौरा केला आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची तपासणी केली आणि शेतकर्‍यांशी चर्चा केली. पाटील यांनी ऊस शेतकर्‍यांचीही भेट घेतली, अंदाजानुसार पावसामुळे जवळपास 2,300 हेक्टर वर पीकांचे नुकसान झाले आहे.

पाटील म्हणाले, तहसीलदारांना एक आदेश जाहीर करण्यास सांगितले आहे , नुकसान झालेल्या शेताचा पंचनामा, 30 ऑक्टोबर च्या आत पूर्ण करण्यासाठी गावातील अधिकार्‍यांना सांगावे. तसेच, तहसीलदार यांना स्पष्टपणे सांगावे लागेल की, जर कुठल्या शेतकर्‍यांनी तक्रार केली की, भरपाई साठी त्या शेताचे सर्वेक्षण करण्यात आले नाही, तर संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. तसेच, सर्वेक्षणाची योजना बनवण्यापूर्वी एक दिवस आधी , त्या गावातील शेतकर्‍यांना विशेष सूचना दिली जावी.

पाटील यांनी जिल्हा कृषी अधिक़ार्‍यांना ऊसासह शेतांचे विवरण प्राप्त करण्याचेही निर्देश दिले, जिथे ऊस जोरदार हवेमुळे पडले आहेत. त्यांनी सांगितले, अशा परिस्थितिमध्ये ऊसाची तोडणी ताबडतोब केली जावी आणि कारखान्यांनी गाळपासाठी ऊस घेवून गेला पाहिजे जेणेकरुन पीकाचे आणखी नुकसान होवू नये.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here