भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 46,389

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 215.98 (2,15,98,16,124) कोटींची संख्या पार केली. ्

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.07 (4,07,27,863) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

भारतातील रुग्णसंख्या सध्या 46,389 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.1% इतकी आहे.

रिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.71%. झाला आहे.

गेल्या 24 तासांत 5,748 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,39,41,840 झाली आहे. गेल्या 24 तासात 6,422 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,14,692 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.06 (89,06,13,782) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.71% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.04% आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here