‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी रोखली ऊस वाहतूक

शहादा : तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊसाला प्रती टन २९०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. प्रकाशा गावाजवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली. प्रकाशा गावाजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवत आंदोलन केले. साखर कारखान्यांनी उसाला प्रती टन २९०० रुपये दर द्यावा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here