अदानी समूह आगामी दशकात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार, ऊर्जा संक्रमणासाठी भर

नवी दिल्ली : पुढील दशकात अदानी ग्रुप ऊर्जा क्षेत्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये मुख्यत्वे ऊर्जा संक्रमाणावर भर देण्यात आला आहे. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी मंगळवारी, २७ सप्टेंबर रोजी आपल्या गेम चेंजिंग योजनांची घोषणा केली. भारत ऊर्जेचा निर्यादार देश बनू शकतो असेही त्यांनी सांगितले. अदानी ग्रुपच्यावतीने आपल्या गुंतवणुकीमधील ७० टक्के रक्कम एनर्जी ट्रान्झिक्शन स्पेस आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केली जाणार आहे. अदानी यांनी सिंगापूरमध्ये फोर्ब्स ग्लोबल सीईओ परिषदेत सांगितले की, आम्ही आधीच जगातील सर्वात मोठे सोलर उत्पादक बनलो आहोत. आणि याच अनुषंगाने काम करण्याची आमची तयारी आहे. आम्ही एनर्जी ट्क्न्झिक्शन स्पेसबाबत जे प्रयत्न करीत आहोत, त्यातून अदानी न्यू इंडस्ट्रीजची ओळख होईल. आम्ही इंटिग्रेटेड हायड्रोजन बेस्ड व्हॅल्यू चेनमध्ये ७० अब्ज डॉलरच्या गुंतवणूक करणार आहोत.

मनीकंट्रोल डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, चेअरमन अदानी म्हणाले की, आम्ही २० जी डब्ल्यूच्या रिन्यूएबल्स पोर्टफोलिओशिवाय नव्या व्यवसायात १,००,००० हेक्टर क्षेत्रात ४५ जीडब्ल्यू अतिरिक्त हायब्रिड रिन्यूएलबल वीज उत्पादन करणार आहोत. हा परिसर सिंगापूरच्या १.४ पट आहे. यामध्ये ३० लाख मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजनचे कमर्शिअलायझेशन निश्चितच होईल. या व्यवसायात अदानी ग्रुप भारतामध्ये सोलर मॉड्यूल, विंड टर्बाइन, हायड्रोजन इलेक्ट्रोलायजर्सच्या निर्मीतीसाठी तीन कारखान्यांची उभारणी करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here