अदानी ग्रुपच्या या कंपनीत गुंतवणुकीची शानदार संधी, लवकरच येणार आयपीओ

78

जर तुम्ही अदानी समुहाच्या कंपनीत गुंतवणूक करू इच्छित असाल तर लवकरच ही संधी मिळणार आहे. सोमवारी खाद्य तेल कंपनी अदानी विल्मर लिमिटेडने इनिशियल पब्लिक ऑफरच्या (आयपीओ) माध्यमातून ४५०० कोटी रुपये गुंतवणुकीसाठी बाजार नियामक सेबीकडे प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनी फॉर्च्युन ब्रँडच्या माध्यमातून खाद्यतेल विक्री करते. या क्षेत्रातील ही प्रमुख कंपनी आहे. अदानी विल्मर लिमिटेडमध्ये अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड आणि विल्मर इंटरनॅशनल लिमिटेडची ५०-५० टक्के भागीदारी आहे.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, अदानी विल्मर आयपीओच्या माध्यमातून ४५०० कोटी रुपयांचे नवे शेअर जारी करेल. अदानी समुहाने बाजाराला दिलेल्या माहितीनुसार यामध्ये विक्रीच्या प्रस्तावाचा समावेश आहे. कंपनी आयपीओमधून जमवलेल्या पैशांचा उपयोग सध्याच्या यंत्रणेचा विस्तार आणि नव्या कारखान्यासाठी खर्च करेल. याशिवाय, कंपनीची कर्जे चुकविणे, गुंतवणूक तथा इतर कामांना केली जाईल.

शेअर बाजारात लिस्ट होणारी ही अदानी समुहाची सातवी कंपनी आहे. यापूर्वी अदानी पोर्ट, अदानी एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवरसह सहा कंपन्या शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. देशात फॉर्च्युन ब्रँड ऑइलची बाजारात २० टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीच्या ४० युनिटची रिफायनिंग कपॅसिटी १६,८०० टन आहे. तर पॅकेजिंग कपॅसिटी १२,९०० टन आहे. याशिवाय कंपनी साखरचा व्यपारात पण आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here