अदानी विल्मर आयपीओत पैसे गुंतवणाऱ्यांना बंपर कमाईची संधी मिळाली आहे. १२.१८ वाजता बीएसईवर अदानी विल्मरचे शेअर १९.९८ टक्के तेजीसह ३१८.२० रुपयांवर ट्रेड करीत होते. बीएसईवर अदानी विल्मरच्या शेअरवर अप्पर सर्किट लागले आहे. यापूर्वी काल, ८ फेब्रुवारी रोजी लिस्टिंगच्या दिवशी कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांपर्यंत अप्पर सर्किट लागले होते. शेअरची सुरुवात थोडी कमजोर झाली. मात्र, त्यानंतर तेजी दिसू लागली आहे. काल हा शेअर १६ टक्के वाढून क्लोज झाला होता.
एफएमसीजी ब्रँड फॉर्च्युनची मुख्य कंपनी असलेल्या अदानी विल्मरचे शेअर मंगळवारी बाँबे स्टॉक एक्स्चेंजवर ४ टक्के डिस्काऊंटवर, २२१ रुपयांवर लिस्ट झाले. तर एनईसईवर १ टक्का डिस्काउंटने २२७ रुपयांना हे शेअर लिस्ट झाले. अदानी विल्मर आयपीओचा प्राइस ब्रँड २१८-२३० रुपये होता. अदानी विल्मरने शेअरधारकांना लिस्टींग डे म्हणजे ४० टक्के रिटर्न दिले आहे. अदानी विल्मरचा आयपीओचा लॉट ६५ शेअर्सचा ठेवण्यात आला होता. हा इश्यू ओव्हरऑल १८ पट सबस्क्राइब झाला आहे.