अदानी विल्मरला जबरदस्त नफा, रामदेव बाबांच्या कंपनीला देणार टक्कर

गेल्या आर्थिक वर्षात खाद्य तेल क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या अदानी विल्मर कंपनीला जबरदस्त नफा झाला आहे. या कालावधीत अदानी विल्मरचा नफा ५८ टक्क्यांनी वाढून ७२७.६४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात विल्मरने ७२७.६४ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीने ४६०.८७ कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न २५ टक्क्यांनी वाढून ३७,१९५.६५ कोटी रुपयांवर पोहोचले. याआधीच्या वर्षात ते २९,७६६.९८ कोटी रुपये होते.

दरम्यान, अदानी विल्मर कंपनीने आता आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने सेबीकडे ४५०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी कागदपत्रे जमा केली आहेत. कंपनी आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात लिस्टींग करेल. अहमदाबादची कंपनी अदानी विल्मर फॉर्च्यून ब्रँडने खाद्य तेल आणि इतर साहित्य विक्री करते. शेअर बाजारात खाद्य तेल क्षेत्रात कंपनीला रुची सोयाशी टक्कर द्यावी लागेल, सध्या रुची सोयाचा शेअर ११०० रुपयांवर आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल ३३ हजार कोटी आहे. या कंपनीचे २०१९ मध्ये रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदने अधिग्रहण केले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here