संत मुक्ताई कारखान्याला ज्यादा कर्ज: आमदार पाटील

200

जळगाव : संत मुक्ताई साखर हा खासगी कारखाना ४९ कोटींना शिवाजी जाधव यांनी घेतला. नंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड रोहिणी खडसे या त्यात भागीदार झाल्या. या कारखान्यास जिल्हा बँकेकडून किंमतीपेक्षा जादा कर्ज दिले आहे. या गैरप्रकाराबाबत मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार
चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

दूरध्वनी वरुन मुख्यमंत्र्यांशी बोलताना आम. पाटील म्हणाले, हा सत्तेचा दुरुपयोग आहे. या खासगी कारखान्यासाठी ५१ कोटी कर्ज जिल्हा बँकेने मंजूर केले. त्यापैकी उचल मात्र केवळ ३० कोटींचीच करण्यात आली.

सोमवारी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार देणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here