मनीला : स्थानिक स्तरावर मोलॅसिस पुरेशा प्रमाणात असतानाही सरकारकडून बायो इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त मोलॅसिस आयातीस परवानगी देण्याच्या प्रस्तावाला साखर कारखान्यांनी विरोध केला आहे. फिलिपाइन्स शुगर मिलर्स असोसिएशन इंक (PSMA)ने एका निवेदनात बायो इथेनॉल उत्पादनासाठी मोलॅसिसच्या पुरेशा उपलब्धतेबाबत सरकारला जाणीव करून दिली आहे. फिलिपाइन्सच्या इथेनॉल प्रोड्यूसर्स असोसिएशनने (ईपीएपी) सरकारकडून मोलॅसिसची नियमित आयातीला अनुमती देण्याची मागणी केली आहे. कारण इथेनॉल उत्पादकांचा उत्पादन खर्च कमी होऊ शकेल आणि बायोइथेनॉलच्या किमती अधिक चांगल्या होऊ शकतील. मोलॅसिसचा वापर डिस्टिलरींकडून अल्कोहोल आणि इथेनॉल उत्पादनासाठी केला जातो.
पीएसएमएचे कार्यकारी संचालक जीसस बॅरेरा यांनी सांगितले की, अलीकडील काही महिन्यात काही कारखान्यांनी मोलॅसिसचा साठा वाढवला आहे. बायोइथेनॉलसाठी मोलॅसिसच्या आयातीची काहीच गरज नाही. शुगर नियमाक प्रशासनाकडील (एसआरए) आकडेवारीचा आधार देत बर्रेरा यांनी सांगितले की, २९ जानेवारीपर्यंत मोलॅसिसचे उत्पादन ४७१०४६.१८ मेट्रिक टन (एमटी) पर्यंत पोहोचले आहे. गेल्या हंगामातील उत्पादनापेक्षा ते ३.३८ टक्के अधिक आहे. डेटानुसार मागणी जवळपास १७ टक्क्यांनी घटून ३,४९,५०९ मेट्रिक टन झाली आहे.
बॅरेरा यांनी सांगितले की, एसआरएकडील आकडेवारीनुसार आमचा एकूण मोलॅसिस साठा कारखाना साइटवर ऑक्टोबर २०२२ अखेरी १,६२,९८७ मेट्रिक टन आणि नोव्हेंबर २०२२ च्या अखेरीस १,८५,३६० मेट्रिक टन होता. २९ जानेवारी २०२३ पर्यंत हा साठा वाढून २,६२,८९३ मेट्रिक टन झाला होता. गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत हा साठा ८.०८ टक्क्यांनी अधिक आहे. आमच्याकडे पुरेशा प्रमाणात मोलॅसिस आहे. कोणतीही राष्ट्रीय आणीबाणी अथवा मोलॅसिसचा तुटवडा नाही. आम्ही खास करुन बायोइथेनॉलच्या उत्पादनासाठी अधिक प्रमाणात मोलॅसीस आयात करण्याची गरज नाही.