विठ्ठलराव शिंदे कारखान्यातर्फे १६ जानेवारीपासूनच्या उसाला जादा दर : अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने चालू गळीत हंगामामध्ये १६ ते ३१ जानेवारी यांदरम्यान गाळपास येणाऱ्या ऊसासाठी जाहीर केल्याप्रमाणे उत्तेजनार्थ अंतिम ऊस दरापेक्षा प्रती टन ५० रुपये आणि १ ते २८ फेब्रुवारी यांदरम्यानच्या उसाला प्रती टन १०० रुपये दिला जाणार आहे. कारखाना एक मार्चपासून पुढे गाळपास येणाऱ्या उसासाठी प्रती टन १५० रुपये याप्रमाणे वाढीव ऊस दर देण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक, अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी दिली.

आमदार शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब यांच्याकडून ३१ डिसेंबरअखेर ऊस बिल व १५ डिसेंबरअखेर ऊस तोडणी, वाहतूक बील शेतकऱ्यांच्या, वाहन मालकांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. कारखान्याच्या पिंपळनेर युनिटने ८ लाख २२ हजार ९४८ मे. टन आणि करकंब युनिटने २ लाख ८० हजार ७८४ मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. या हंगामामध्ये पिंपळनेर युनिटच्या सहवीज प्रकल्पातून आजअखेर ३,३०,६५,००० हजार युनिट वीज विक्री करण्यात आली आहे. करकंब युनिटने १,०१,१३,००० युनिट वीज विक्री केली आहे. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here