आदिनाथ साखर कारखान्याचा गुरुवारी गळीत हंगाम प्रारंभ : बाळासाहेब बेंद्रे

सोलापूर : करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याच्या मशीनरीचे काम पूर्ण झाले आहे. आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे कारखाना गाळपास सज्ज झाला आहे. कारखान्याच्या २८ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ गुरुवारी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून होणार आहे. प्रशासकीय मंडळ अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे यांनी सांगितले की, दरम्यान, दिवाळीनिमित्त २०१८-१९ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली प्रती मे. टन ९० रुपयेप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम वाटप होणार आहे. गेल्या हंगामातील ऊस तोडणी वाहतूकदारांचे थकलेले सर्व एक कोटी दहा लाख रुपये पे मेंट देण्यात आले आहे.

अध्यक्ष बेंद्रे म्हणाले, आदिनाथ कारखाना गिळंकृत करण्याचा प्रयत्न काही व्यक्तींनी केला होता. हा डाव हाणून पाडण्यासाठी बचाव समितीने केलेले प्रयत्न व आर्थिक मदत प्रा. तानाजी सावंत व प्रा. शिवाजी सावंत यांनी केली. याबद्दल प्रा. शिवाजीराव सावंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कारखान्याचे विस्तारीकरण नजरेसमोर ठेवून उजनी येथून आठ इंची डबल पाईपलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विस्तारीकरणासाठी राज्य शासनाच्या थकहमी मिळवून नवीन दीडशे कोटी रुपये कर्ज मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंजुरी देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here