ब्राझील साखर कारखाना मॉडेलचा अवलंब करा

साखरेच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवण्यासाठी भारताने ब्राझीलला आउटसोर्स केले असल्याची माहिती, भारतीय कृषी संशोधन मंडळाचे सहायक महासंचालक आर.के. सिंग यांनी दिली आहे.  सोमवारी यू.एस.ए. येथील शेतकरी ज्ञान केंद्रामध्ये ऊसाबद्दल भारतीय ऊस संशोधन संस्था आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीत ते बोलत होते. सिंग म्हणाले, पाच दशलक्ष हेक्टर जमीनीवर ऊसाचे पीक घेतले जाते, 380 दशलक्ष टनांपेक्षा कमी साखर उत्पादन घेतले जात नाही.

गेल्या 49 वर्षात ऊस लागवडीत तीनपट वाढ झाली आहे, तर साखर उत्पादान आठ पट वाढ झाली आहे. शिवाय साखर वसुलीचे प्रमाणही 1.8 पटीने वाढले आहे.  ते म्हणाले, जादा उत्पादनामुळे सरकारने नवीन साखर धोरण आणले ज्यामध्ये ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. इतकी वर्षे मोलॅसिसपासून इथेनॉल तयार केले जात होते, ते आता ऊसाच्या रसापासून तयार होईल.  यावर्षी देशात 130 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले असून त्यापैकी 40 टक्के उत्पादन घेवून उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे.

देशाच्या एकूण जिडीपी मध्ये 15.2 टक्के वाटा कृषी क्षेत्राचा असून, त्यापकी 6 टक्के ऊसाचा आहे. कापसानंतर ऊस हे देशात सर्वाधिक उत्पन्न मिळणारे पीक आहे. भारताने इथेनॉलच्या उत्पादनावर लक्ष केेंद्रीत केले आहे, जे कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये मिसळले जावू शकते. सध्या, पाच टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात आहे, पण 2024 पर्यंत 30 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाईल. यामुळे आयात 70 टक्के कमी करण्यात मदत होईल.  सिंग यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी ब्राझील साखर कारखाना मॉडेलचा अवलंब करावा ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत वाढल्यास किंवा किंमतीत घट झाल्यास, चांगला महसूल मिळण्यासाठी इथेनॉल उत्पादनास एखादा पर्याय निवडा असेही ते म्हणाले.

उगार साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रफुल्ल शिरगाावकर म्हणाले, किंमत आणि उत्पादनाच्या गोंधळामुळे उत्पादकांना आणि साखर कारखान्यांना देखील मोठा फटका बसला आहे. कारखान्यांना गाळप लवकर सुरु करायचं होतं, पण अकाली पिकांमुळे ते होवू शकले नाही. गाळप हंगाम नोव्हेंबर मध्ये सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले. इथेनॉल उत्पादनाबाबत बोलताना ते म्हणाले, पेट्रोलमध्ये 30 टक्के इथेनॉल मिसळण्याबाबतची सरकारने उचललेली पावले स्वागतार्ह आहेत. कारखान्यांनीही याबाबत विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.  यूएएस चे कुलगुरु एम.बी. चेट्टी म्हणाले, बीट सारख्या पर्यायी पिकांच्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करावा. तसेच हवामान बदलांमुळे दुष्काळ प्रतिरोधक ऊसाचे वाण विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितलेे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here