केपटाउन : साखरेच्या वाढत्या मागणीमुळे आफ्रिकेमध्ये उद्योग विस्ताराचा मार्ग प्रशस्त झाल्याचे ऑक्सफोर्ड बिझनेस ग्रुपच्या अहवालात म्हटले आहे. संपूर्ण खंडामध्ये साखरेच्या खपात झालेली वाढ आणि सहारा आफ्रिकेत उत्पादन उच्च स्तरावर असल्याने उद्योगाच्या विकासाची संधी वाढल्याचे सांगण्यात येते.
आफ्रिकेतील ओबीजी ग्रुपचे कार्यकारी संचालक काराईन लोहमॅन यांनी सांगितले की, आफ्रिकेतील लोकसंख्येतील वाढ आणि कोरोना महामारीमुळे उत्पन्नात झालेल्या घसरणीमुळे आगामी काही वर्षात साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या प्रती व्यक्ती साखरेचा खप जागतिक निकषांच्या निम्म्यावर आहे. उत्पादनात वाढ करण्यासह देशांतर्गत गरजांची पूर्तता करण्यााठी खूप संधी असल्याचे मानले जात आहे.
आफ्रिकेतील साखर उद्योग या आपल्या अहवालात गुंतवणुकदारांसाठी शेती आणि संशोधन, बंदर सुविधांसारख्या पायाभूत बाबींवर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्योगाच्या विकासात योगदान देण्यासाठी असलेल्या संधींवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link