केरळनंतर आता महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची भीती

मुंबई : ऑक्टोबरच्या अखेरीस अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. किमान ६० लाख लोकांना कोविड १९चा फटका बसू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, किमान १३ लाख लोकांना ऑक्सिजन सपोर्टची गरज भासेल. सीएनएन-न्यूज १८ शी बोलताना मंत्री म्हणाले, आम्ही ऑक्सिजन क्षमता २००० मेट्रिक टनापर्यंत वाढवली आहे. केरळमध्ये ओणम उत्सवानंतर उच्चांकी कोरोनाचा फैलाव झाला आहे. येथेही गणेश चतुर्थी, नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे लागोपाठ सण असल्याने महाराष्ट्रातही कोविडचा फैलाव होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कोविड १९च्या निर्बंधांमधून सवलती देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गतीने रुग्ण वाढले होते. त्यामुळे सध्या चित्रपटगृहे, धार्मिक स्थळे बंद आहेत. मॉल उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुकानांच्या वेळाही वाढवण्यात आल्या आहेत
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here