कृषी कायद्यांनंतर आता राकेश टिकैत यांचे ऊस थकबाकीदारांवर लक्ष

गाझियाबाद: ऊसाचे थकीत पैसे आणि त्यावरील व्याज या मुद्यांनी उत्तर प्रदेशचे वातावरण तापले आहे. शेतकरी संघटनांनी आता या मागणीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने सुरू केली आहेत.

भारतीय किसान युनियनने (बीकेयू) शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत उत्तर प्रदेशमध्ये ऑगस्टमध्ये जिल्हास्तरीय बैठका आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील महागडा वीज दर आणि थकीत असलेल्या ऊस बिलांचा प्रश्न मांडला जाणार आहे. बीकेयूचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, या प्रश्नांबाबत भूमिका ठरवली जात आहे. यााबबत ११ जुलै रोजी किसान संघाची विभागीय स्तरावर समितीची बैठक होईल.
गाझीपूर सीमेवर आयोजित पत्रकार परिषदेत टिकैत म्हणाले, राज्यातील १८ विभागातील प्रत्येक जिल्ह्यात एक ऑगस्टपासून आंदोलन सुरू होईल. एक ऑगस्टपासून विभागीय समित्या प्रत्येक जिल्ह्यात तिन्ही कृषी कायद्यांतील घातक तरतुदी मांडतील.

दरम्यान, अनेक शेतकरी संघटनांनी थकीत ऊस बिलांचा प्रश्न मांडला आहे. उत्तर प्रदेशात थकलेल्या ऊस बिलांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पैसे त्वरित मिळावे यासाठी राष्ट्रीय किसान मजदूर संघाच्या (आरकेएमएस) नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. संघटनांनी कारखान्यांकडे व्याजाचीही मागणी केली आहे. संघटनेने १५ जुलै रोजी लखनौ मार्चचे आवाहन केले आहे. यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी महापंचायतीचे आयोजन केले आहे. संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. सिंह यांनी सांगितले की, बिजनौर, मुजफ्फरनगर, सहारनपूर आणि मेरठमध्ये पंचायतींचे आयोजन केले आहे. १२ जुलैपर्यंत सर्व जिल्ह्यांत बैठका पूर्ण होतील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here