पुणे जिल्ह्यात आगीत सात एकर ऊस खाक

पुणे : पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील फिरंगाई मळा परिसरात लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचा सुमारे सात एकर ऊस जळून खाक झाला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता व सतर्कतेमुळे आग सात एकरांवर मर्यादित राहिली. अन्यथा तब्बल १५ ते २० एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता.

संक्रांतीच्या सणामुळे सोमवारी मानसिंग फराटे यांच्या उसाची तोडणी बंद होती. दुपारी अचानक आगीचे लोट उठू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी उसाच्या शेताकडे धाव घेतली. यांदरम्यान आगीत पोपट खराडे यांचा ४ एकर, मानसिंग फराटे यांचा २ एकर आणि विठ्ठल फराटे यांचा एक एकर ऊस जळाला. जमलेल्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मंगळवारी दौंड शुगरने या उसाची तोडणी सुरू केली. मशीनच्या सहाय्याने ही ऊस तोडणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here