साखर कारखान्या समोरील प्रस्तावित धरणे आंदोलन स्थगित

रुडकी : भारतीय किसान यूनियनच्या पदाधिकार्‍यांनी ऊस विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत साखर कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा केली. कारखाना व्यवस्थापनाने शेतकर्‍यांना पाच ऑगस्ट पर्यंत थकबाकी भागवण्याचा विश्‍वास दिला. यानंतर यूनियनने आजपासून प्रस्तावित धरणे आंदोलन स्थगित केले आहे.

भारतीय किसान यूनियन कडून एक आठवड्यापूर्वी जिल्हा प्रशासन तथा कारखाना व्यवस्थापनाला पत्र लिहून सांगण्यात आले होते की, 20 जुलै पर्यंत शेतकर्‍यांची थकबाकी भागवली नाही तर 21 पासून उत्तम साखर कारखान्याच्या गेटच्या बाहेर अनिश्‍चित काळासाठी धरणे आंदोलन केले जाईल. या विषयावर कृषी उत्पादन बाजार समिती परिसरामध्ये भारतीय किसान यूनियनच्या कार्यालयावर शेतकर्‍यांची पंचायत झाली. यामध्ये शेतकर्‍यांनी विविध प्रश्‍नांवर चर्चा केली.

भाकियू जिल्हाध्यक्ष विजय कुमार शास्त्री यांनी सांगितले की, मंगळवारी धरणे प्रदर्शन प्रस्तावित होते. कारखाना व्यवस्थापनाकडून प्रतिनिधीत्व करण्यासाठी आलेले मॅनेजर अनिल सिंह यांनी शेतकर्‍यांना सांगितले की, ते एका आठवड्यामध्ये आठ दिवसांची थकबाकी देतील. पुढच्या महिन्यात 15 तारखेपर्यंत 12 दिवसांची थकबाकी भागवतील, पण शेतकर्‍यांनी त्यांची ही बाब मान्य केली नाही. नंतर व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय झाला की, पाच ऑगस्टपर्यंत शेतकर्‍यांना 20 दिवसांचे पैस मिळाले पाहिजेत.

शेतकर्‍यांनी सांगितले की, पाच ऑगस्टपर्यंत 20 दिवसांचे पैसे मिळाले नाहीत तर सहा ऑगस्ट पासून उत्तम साखर कारखान्यामध्ये टाळेबंदी करुन धरणे आंदोलन सुरु केले जाईल. भारतीय किसान यूनियन ने प्रस्तावित धरणे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.

यावेळी चौधरी रवि कुमार, संजय चौधरी, चौधरी सुक्ररमपाल सिंह, राकेश लोहान, धर्मेद्र चौधरी, कुलदीप सिंह, आदी शेतकरी उपस्थित होते. ऊस समिती लिब्बरहेडी च्या कडून समिती सचीव जयसिंह यांनी देखील शेतकर्‍यांना आश्‍वासन दिले की, पुढच्या गाळप हंगामादरम्यान समितीकडून शेतकर्‍याना पावतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण येंणार नाही.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here