थकबाकीसाठी शेतकऱ्यांचे कारखान्याबाहेर धरणे

801

नारसन (उत्तराखंड): चीनी मंडी

उसाच्या थकीत बिलाची मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी लिब्बरहेडी साखर कारखान्याबाहेर धरणे आंदोलन केले. अखिल भारतीय किसान युनियनने हे आंदोलन केले. जर, थकबाकी दिली नाही तर, महामार्ग रोखून धरण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

साखर कारखान्याच्या गेटवरच अखिल भारतीय किसान युनियनची बैठक झाली. जिल्हाध्यक्ष रामपाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. ते म्हणाले, ‘ऊस बिलाच्या थकबाकीमुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. कारखाना व्यवस्थापन सातत्याने शेतकऱ्यांना सतावत आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. पण, थकबाकी दिली जात नाही. शेतकऱ्यांना दैनंदिन खर्चासाठीदेखील कर्ज काढावे लागत आहे. मुलांच्या शाळेची फी देणेदेखील अनेकांना अवघड झाले आहे.’

युनियनचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी शेतकऱ्यांची सातत्याने उपेक्षा केली जात असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. शेतकऱ्यांची देणी देण्यात सरकारही अपयशी ठरले आहे.

उत्तर प्रदेशातील शेतकरी रस्त्यावर आला आहे. सरकार त्याची मदत करत नाही. जर, थकबाकी दिली नाही तर, शेतकरी महामार्ग रोखून धरतील, असा इशारा बलजोर यांनी दिला आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here