तेल कंपन्यांकडून २०२०-२१ मध्ये ३४३ कोटी लीटर इथेनॉल खरेदीचे करार

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी (ओएमसी) २०१३-१४ मध्ये ३८ कोटी लिटर इथेनॉल खरेदी केले होते. त्यात वाढ होऊन २०२०-२१ मध्ये ३४३ कोटी लिटर इथेनॉल खरेदी केली आहे. केवळ सात वर्षात इथेनॉलची खरेदी दहा पटींनी वाढली आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमानुसार इथेनॉलचा पुरवठादारांनी सांगितले की २०२०-२१ या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी ३४३.१६ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे करार केले आहेत. ओएमसीला २ ऑगस्टअखेर २०९.६७ कोटी लिटर इथेनॉल मिळाले आहे. इथेनॉल पुरवठ्यासाठी १ डिसेंबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०३१ असा वर्षाचा कालावधी आहे.

पेट्रोलियम तथा नैसर्गिक गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी ९ ऑगस्ट रोजी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ओएमसी आपल्या घाऊत खरेदीदारांना इथेनॉलमिश्रित पेट्रोल विकत आहे. त्यामध्ये ९० टक्के पेट्रोल आणि १० टक्के इथेनॉल आहे. केंद्र सरकारने २०१४ मध्ये देशात इथेनॉलचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासाठी विविध उपाय केले आहेत. इथेनॉल पुरवठा वर्ष २०१७-१८ पासून दरवर्षी इथेनॉलच्या एक्स मिल दरात वाढ, ईबीपी कार्यक्रमासाठी इथेनॉलवरील जीएसटी कमी करून पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here