सह्याद्री कारखान्याचे सॅनिटायजर लवकरच विक्रीसाठी बाजारात

कराड , जि. सातारा : बाजारपेठेत सॅनिटायजरची कमतरता जाणवत असल्याने सहकारी साखर कारखान्यांनी आता सॅनिटायजर निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. सह्याद्री कारखान्याने सॅनिटायजर निर्मिती केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या नागरिकांकडून मास्क, सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किंमतीत सह्याद्री कारखान्याचे हॅन्ड सॅनिटायजर लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसातून दर दोन तासांनी हात धुवा, हॅन्ड सॅनिटायजरचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मात्र ‘कोरोना’चा पहिला रूग्ण सापडल्यानंतर बाजारपेठेत मास्क व हॅन्ड सॅनिटायजरची कमतरता जाणवू लागली. यास्थितीत सर्वसामान्यांना हॅन्ड सॅनिटायजर मिळावे, यासाठी काही साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे.

यात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्ष असलेल्या सह्याद्री कारखान्यानेही सॅनिटायजरचे उत्पादन घेतले आहे. अल्कोहोल व त्यावर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले सॅनिटायजर विविध रंगात उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.

साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, सह्याद्री कारखान्याने हन्ड सॅनिटायजरची निर्मिती केली आहे. त्याचा उत्पादन खर्च पाहून त्याची किंमत निश्चित केली जाईल. बाजारपेठेतील सॅनिटायजरच्या किमतीपेक्षा त्याची किंमत नागरिकांना परवडणारी असेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here