IoTechWorld एव्हीगेशन कृषी ड्रोन निर्मात्यांकडून पाच राज्यांत स्थापन होणार पायलट प्रशिक्षण केंद्र

भारतीय कृषी ड्रोन निर्माता, IoTechWorld एव्हिगेशनने सोमवारी सांगितले की, जुलैपर्यंत पाच राज्यांत दूरस्थ पायलट प्रशिक्षण केंद्रे (आरपीटीओ) स्थापन केली जातील. कंपनीने या आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३,००० ड्रोन विक्री करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल आहे. गेल्या वर्षी फक्त ५०० ड्रोनची विक्री झाली होती.

कंपनीने ही माहिती देताना सांगितले की, जून महिन्यात यापैकी तीन गुरुग्राम (हरियाणा), चिकबल्लापूर (कर्नाटक), आणि समस्तीपूर (बिहार) येथे केंद्रे सुरू होतील. तर दोन केंद्रे राजमुंदरी आणि विजयवाडा, आंध्र प्रदेशमध्ये जुलैपासून कामकाज सुरू करतील. सद्यस्थितीत कंपनीने RPTOs साठी अनेक विद्यापीठे व इतर संस्थांसोबत भागिदारी केली आहे. आणि कंपनी नव्या RPTOs सुद्धा संघटनांसोबत भागिदारीत सुरू करण्याचा विचार करीत आहे.

यासोबतच विक्रीपश्चात सेवा आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कंपनी प्रशिक्षण केंद्रांशिवाय, कोल्हापूर -महाराष्ट्रात कृषी ड्रोनसाठी नवे सेवा केंद्र सुरू करणार आहे. कंपनीने असेही सांगितले की, जादा सेवा केंद्रे सुरू झाल्यावर कंपनीच्या ग्राहकांच्या गरजा भागवल्या जावू शकतात. कंपनीचे सह संस्थापक आणि संचालक दीपक भारद्वाज यांनी आगामी RPTOs मध्ये दोन महिने लागतील.

कंपनीचे दुसरे सह संस्थापक आणि संचालक अनुप उदाध्याय यांनी आपल्या योजनांबाबत आपण उत्साही असल्याचे सांगितले. भारतात कृषी ड्रोन बाजारात IoTechWorld ची स्थिति मजबूत असलाचे सांगितले. कंपनी ग्राहकांना उच्च गुणवत्ता असलेले कृषी ड्रोन आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा देत असल्याचे सांगितले. यातून ग्रामीण युवकांना नोकरीच्या संधीही मिळणार आहेत.

कंपनीने ड्रोन कमीत कमी ७० टक्के भारतीय कंपोनंट्सपासून तयार केल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी ड्रोनच्या वापरावर फोकस करीत आहेत. कृषी ड्रोन खरेदीाठी सरकारकडून आर्थिक मदतीची तरतुदही देण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना केंद्र सरकारने २०२१ मध्ये ड्रोन आणि ड्रोन घटकांच्या उत्पादनांसाठी संलग्न प्रोत्साहन PLI योजना मंजुर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here