शेतकर्यांना हुमनी पासून वाचाविनेसाठी कृषी विभाग राबविणार मोहीम

796

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर : चीनी मंडी

हुमणी किडीमुळे यंदाच्या हंगामात उसाचे नुकसान झाले आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादकांना याचा मोठा फटका बसला आहे. पण, या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता कृषी विभागाने एक पायलट प्रोजेक्ट राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ६०० गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला साखर कारखान्यांनीही साथ दिली असून, पावसाला सुरुवात होण्यापूर्वी कृषी विभाग आणि साखर कारखान्यांचे कामगार गावोगावी एकत्रित मोहीम राबविणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात हुमणीने मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाचे नुकसान केले आहे. दरवर्षी या नुकसानीत वाढ होताना दिसत आहे. मात्र, ही कीड रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याची गंभीर दखल घेतली. कृषी विभागातील कर्मचारी आणि साखर कारखानदारांची विशेष बैठक बोलवून या विषयाची माहिती घेतली तसेच किडीचा प्रादुर्भाव असणाऱ्या गावांची यादी मागवली. त्यात सहाशे गावांमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे आढळल्यानंतर तेथे कीड रोखण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचे ठरले. यासाठी कृषी विद्यापीठाकडून तांत्रिक सहाय्य घेतले जाणार आहे.

कृषी विभागाचे कृषी सहायक, आत्माचे कृषी मित्र आणि कारखानदारांचे प्रतिनिधी एकत्रित ही मोहीम राबवणार आहेत. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी दहा ते वीस जून दरम्यान, हुमणीचे भुंगे बाहेर पडतात. हे भुंगे नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. गावागावांत कारखानदारांना एकत्र घेऊन ही यंत्रणा राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली. तसेच हुमणी विरोधात मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. ही योजना नीट राबविण्यास जिल्ह्यातून हुमणीचे संकट दूर होईल, असे मत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here