कृषी विविधीकरण : ऊसासारख्या वैकल्पिक पिकांवर भर देण्याचे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी पंजाबमधील शेतकरी संघटनांसोबत बैठक घेऊन पिक वैविध्यिकरणाबाबत चर्चा केली. याशिवाय कृषी क्षेत्रातील पाणी, वीज या गोष्टींचा वापर कमी करण्याच्या पद्धतींविषयीही यावेळी चर्चा झाली. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांना किमान समर्थन मूल्य (एमएसपी) देण्यासह उष्णतेच्या लाटेळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्याबद्दल ५०० रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री मान यांनी सांगितले की, जून महिन्याऐवजी मे महिन्यापर्यंत वीजेच्या स्थितीत सुधारणा होईल. याशिवाय ऊसाची थकबाकी जुलैपर्यंत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी ऊस, मका, कडधान्ये आणि तेलबिया अशा बहुपर्यायी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले. मुख्यमंत्री मान यांनी बैठकीस उपस्थित २३ शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींकडून सूचना मागवल्या. राज्य सरकार कृषी क्षेत्राला वीज पुरवठा करण्याबाबत सुचना द्याव्यात. शेतकऱ्यांना डीएसआर तंत्रज्ञान आणि पारंपरिक पिक लागवडीवेळी सुविधा मिळण्याबाबत त्यांनी विचारणा केली. ते म्हणाले की, पिक लागवडीवेळी प्रस्तावित विज पुरवठ्यामुळे अडचणी येऊ नयेत याची काळजी घेतली जाईल. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएसपीसीएल) माध्यमातून मागणीनुसार समान विजेचा पुरवठा निश्चित करण्याबाबतची सूचना केली. त्यातून राज्याची चार क्षेत्रात विभागणी होईल.

ऊस मक्का, कडधान्ये आणि तेलबिया अशा वैकल्पिक पिकांची लागण करुन शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात वैविध्यिकरणाचा पर्याय देताना मान यांनी आश्वासन दिले की, सरकार लवकरच या पिकांना एमएसपी देण्याचा मुद्दा उपस्थित करेल. एमएसपीबाबत मार्कफेड, राज्यातील संस्थांचाही सहभाग घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here