आर्थिक वर्ष२०२१-२२ च्या पहिल्या १० महिन्यांत कृषी उत्पादनांची निर्यात २५ टक्क्यांवर

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यात भारताची कृषी उत्पादनांची निर्यात ४०.८७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया सिंह पटेल यांनी लोसभेत दिली. गेल्या वर्षी समान कालावधीच्या तुलनेत ही निर्यात २५.१४ टक्क्यांनी अधिक आहे. पटेल यांनी सांगितले की, गहू, साखर आणि कापूस यांसह प्रमुख कृषी उत्पादनांच्या निर्यातीत पुरेशी वाढ दिसून आली आहे.

प्रश्नोत्तराच्या तासात मंत्र्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२१ पासून जानेवारी २०२२ दरम्यान, कृषी उत्पादनांची निर्यात गेल्या वर्षीच्या ३२.६६ बिलियन डॉलरच्या तुलनेत ४०.८७ बिलियन डॉलर झाली आहे. ही निर्यात २५.१४ टक्क्यांनी अधिक आहे.

यावर्षी भारत उच्चांकी साखर निर्यात करण्याच्या मार्गावर आहे. मंत्री पटेल यांनी सांगितले की, कृषी निर्यातीत वाढीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्यांच्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here