ऊस गाळपाचे चांगले नियोजन, गाळपाअभावी ऊस शिल्लक नाही

पुणे: यंदाच्या हंगामात कोरोना संकट आणि लॉक डाउन मुळे साखर उद्योगावर परिणाम होवूनही राज्यातील कारखान्यांनी आणि ऊस तोड मजुरांनी ऊस गाळपाचे काटेकोर आणि योग्य नियोजन केल्यामुळे गाळपाअभावी कुठेही ऊस शिल्लक राहिलेला नाही, असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या हंगामात गाळपाचा प्रश्न कारखान्यासमोर नव्हता. तर उत्पादित केलेल्या साखरेला कुठेही उठाव नव्हता. साखरेची विक्री हा एकमेव प्रश्न कारखान्यांसमोर होता.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार १५ मार्च पर्यंत ५०१ लाख टन ऊस गळीतास आला होता. गाळपास आलेल्या ऊसापासून कारखान्यांनी ५५८ लाख ४९ क्विंटल साखर तयार केली. लॉकडाऊन मध्ये एप्रिल महिन्यापर्यंत एक लाख टनाच्या आसपास ऊस शिल्लक होता. त्याचे देखील गाळप झालेले आहे.

दांडेगावकर यांनी स्पष्ट केले की, “ भारतातून ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दीष्ट होते, मात्र लॉक डाउनमुळे निर्यात ३४ लाख टनाच्या आसपास झालेली आहे. शिवाय कारखान्यांकडे एप्रिलचा विक्री कोटा शिल्लक राहिला आहे . यावर तोडगा म्हणून केंद्राने हा कोटा मे महिन्यात विकण्यासाठी मंजूरी दिली आहे.,”

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here