कोल्हापूर: थकीत एफआरपीवरील व्याज द्यावे, या प्रमुख मागणीसाठी काल अंकुश, जय शिवराय किसान संघटनेने थेट साखर सहसंचालक कार्यालयात धडक मारली. यावेळी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कार्यालयातून हलणार नसल्याचा पवित्रा संघटनेच्या पदाधिकार्यांनी घेतला. प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या केबिन बाहेर आंदोलकांनी ठिय्या मारत घोषणाबाजी केली.
मागील हंगामात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस बिले दिली नव्हती. मुदतीत बिले न दिल्यास त्यावर 15% व्याज देणे अनिवार्य असल्याचा कायदा आहे. मात्र अनेक कारखान्याने शेतकर्याला व्याज दिले नाही. त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मागील वर्षभर आम्ही न्यायालयात व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहोत. तसेच साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक यांनीही वारंवार साखर कारखान्यांना व्याज द्यावे असे आदेश दिले होते. पण कारखाने व्याज देण्यास टाळाटाळ करत आहेत.
आजच्या आंदोलनाची दखल जर साखर सहसंचालक कार्यालयाने घेतली नाही तर भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
थकीत एफआरपी वरील व्याज द्यावे, साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.