ऊस एफआरपी वाढवण्याची, अंकुश संघटनेची मागणी

143

कोल्हापूर: ऊसाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्तींमुळे ऊसाचे घटलेले एकरी उत्पादन त्याचबरोबर वाढता तोडणी वाहतूक खर्च व कारखान्यांची घटलेली रिकव्हरी याचा विचार करून केंद्र सरकारने ऊसाची एफआरपी १० रिकव्हरी बेसला ३००० रुपये करावी, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या ऊसाची एफआरपी १० रिकव्हरी बेसला २७५० रुपये इतकी आहे. केंद्र सरकारने साखरेचा किमान दर वाढवावा. साखरेचा किमान दर ३१०० वरून ३५०० रुपये करण्याची मागणी साखर कारखान्यांच्या संघटनेने केली आहे. केंद्र सरकार ही वाढ करण्याच्या विचारात आहे. आता जर हा दर ३१०० वरून ३५०० रुपये केला तर बाजारातील साखरेचा दर ४० रुपयाच्या पुढे जाणार आहे. पण या दराचा लाभ साखर कारखाने शेतकऱ्यांना घेऊ देणार नाहीत. त्यामुळे ऊसाची एफआरपी १० रिकव्हरी बेसला ३००० रुपये केल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. यासाठी राज्य शासनाने ऊसाची एफआरपी वाढवण्याची शिफारस केंद्राकडे करावी. सरकारने ग्राहक, शेतकरी आणि कारखानदार यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी चुडमुंगे यांनी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here