सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम समारोपाकडे

सातारा : उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे तोडणीची कामे काहीशी मंदावली आहेत. जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी ६२ लाख ६८ हजार ५३० मेट्रीक टन ऊस गाळपाद्वारे ७३ लाख ७८ हजार ८२० क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. ऊसाचे क्षेत्र अजूनही शिल्लक असल्याने ऊस गाळप हंगाम लांबणार आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले असले तरी ऊस गाळप हंगामास अजूनही फटका बसलेला नाही.

सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने आपले ठरलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ६२ लाख ६८ हजार ५३० मेट्रीक टन ऊस गाळपाद्वारे ७३ लाख ७८ हजार ८२० क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. हा हंगाम उशिरा सुरू झाल्याने ऊसाच्या परिपक्वतेत वाढ झाल्याने साखर उताऱ्यात सुधारणा झाली आहे. सध्या जिल्ह्यात सरासरी ११.७७ टक्के उतारा मिळत आहे.

मार्च महिन्यात अनेक कारखान्यांचा ऊस गाळप बंद होते. मात्र, एक महिना उशिरा गाळप सुरू झाल्याने अजूनही सर्व कारखान्यांचे गाळप सुरू आहे. अजूनही ऊसाचे क्षेत्र शिल्लक असल्याने एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हंगाम सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात गाळप, साखरनिर्मिती, साखर उताऱ्यात जरंडेश्वर कारखान्यांची आघाडी असून, सह्याद्रीने २८५५ रुपये पहिली उचल देत सर्वाधिक दर दिला. एकूण गाळपात सात सहकारी कारखान्यांकडून ३२ लाख ९५ हजार २६६ मेट्रीक टन

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here