अकोला: महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती. त्यानंतर सहकार विभागामार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले होते. या योजनेअंतर्गत चुकीच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ होऊ नये यासाठी जिल्हा बँक आणि व्यापारी बॅंका कडील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्ज खाती आधार कार्डशी संलग्न करुन खात्री केली जात आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत चार लाख १२ हजारांव शेतकरी पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. पात्र शेतकन्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. सोमवारी (ता२४) या भागात काही गावांत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली. अकोला जिल्ह्यातील गोरेगाव खुर्द आणि देगाव या दोन गावांत पात्र ठरलेल्यांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत काहींना प्रमाणपत्र देण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सक्तीचे आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांचे आधार क्रमांक अपडेट करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.
या योजनेसाठी अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांतील चार लाख १२ हजार ५८० शेतकरी पात्र ठरलेले आहेत. योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांचे आधार लिंक नाही. यात अकोला जिल्ह्यात १०१५, बुलडाणा ८११ व वाशीम जिल्ह्यातील ५७२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.


















