विठ्ठल साखर कारखान्याच्या कारभाराची चौकशी व्हावी: राजू शेट्टी

पंढरपूर, जि. सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील नावजलेला विठ्ठल साखर कारखान्याची अवस्था पाहावत नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून यासंदर्भात चौकशीची मागणी करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. लवकरच पंढरपुरात येथील कारखान्याच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी साखर परिषद घेतली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी विठ्ठल मंदिरा समोरील नामदेव पायरी जवळ सरकारच्या कर्जमाफी धोरणाच्या विरोधात आंदोलन झाले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, विठ्ठल साखर कारखान्याच्या आर्थिक डबघाईस कारखान्याचे अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहेत. या लोकांनी कारखान्याचा वापर सभासदांच्या हितासाठी न करता केवळ स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक हितासाठी केला आहे. कारखान्याच्या कारभाराची स्वतंत्रपणे
चौकशी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

शेट्टी म्हणाले, “सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे, यासाठी आमचा लढ सुरु आहे. अनेक लोकांनी सहकाराचा स्वहाकार केला आहे. या लोकांनी कोट्यवधी रुपयांची माया जमा केली आहे. साखर कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. करमाळ्यात एका कामगाराने आत्महत्या केली. हे सहकाराचे अपयश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here