सील केलेली साखर विकून थकीत एफआरपी भागवू: प्रांताधिकारी ढोले

सोलापूर: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा नुसार आरआरसीच्या कायद्याअंतर्गत शिखर बँकेच्या परवानगीने गोदामातील सील केलेली ४० ते ५० हजार क्विंटल साखर विकून किंवा कारखान्याची स्थावर जंगम मालमत्ता व अन्य जमिनी जप्त करून, विक्री करून शेतकन्यांची थकित एफआरपी, निवृत्त कामगारांची थकित देयके, ऊस वाहतुकीचे भाडे देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

प्रांताधिकारी ढोले यांनी टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील जनहित शेतकरी संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी ते शेतकऱ्यांशी बोलत होते. भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून ढोले यांनी कारखान्याची माहिती घेतली.

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, प्रत्यक्ष कार्यवाही हवी. पुढील वर्षी कारखानदारांना गाळप परवाना देताना कर्ज, शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे कसे देणार, याची पुराव्यासह माहिती घेऊन गाळप परवाना द्यावा.

या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, श्यामराव पाटील, नाना मोरे, सुभाष शेंडगे, सिद्धाराम वाघमोडे, महावीर भोसले, सुभाष वसेकर, बबन भोसले, भिवा आढेगावकर, गणेश काकडे, हरिभाऊ लोंढे, तानाजी मुळे, मारुती भांगे, बाबासाहेब ताड जिलानी, कल्याण भोसले, अरुण गावडे, अंगद वसेकर, अंकुश घुले, सुधाकर पवार, शिवाजी जाधव, सागर सलगर, अरुण सातपुते आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here