जादा उतारा देणाऱ्या ऊस लागवडीस प्राधान्य देणाऱ्या सभासदांना विशेष अनुदान : आमदार शिंदे

152

टेंभुर्णी :ऊस उत्पादनात वाढ होण्याच्या तसेच साखरेच्या उताऱ्यात वाढ होण्याच्या दृष्टीने जास्त साखर उतारा देणाऱ्या जातीच्या ऊसाची लागवड करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्या अनुषंगाने अशी ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही पूर्वहंगामी लागवड १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत कोसी ६७१, को ८६०३२, व्हीएसआय ८००५ तसेच १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत एम एस १०००१ या जातीच्या ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी करावी, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, जादा साखर उताऱ्यासाठीसाठी बेणे बदल करणे गरजेचे आहे. यासाठीच कारखान्यामार्फत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्याकडून मूलभूत बेणे आणून निवडक शेतकऱ्यांकडे पायाभूत, प्रमाणित बेणे प्लॅाट तयार केले आहेत. हे बेणे प्लॉट हंगाम २०२०-२१ मध्ये केलेले आहेत. सध्याच्या सुरु झालेल्या हंगामात १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोसी ६७१, को ८६०३२, व्हीएसआय ८००५, एम एस १०००१ या जातींचा ऊस लावावा, जेणेकरुन ऊस उत्पादन वाढेल. यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने बेणे आणून केलेल्या ऊस लागवडीची नोंद तीन दिवसांच्या आत गट कार्यालयात करावी. नोंद केल्यानंतर कारखाना कर्मचारी पिकाची नोंद घेतील, असेही त्यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here