खान्देशात ऊसाच्या तुटवड्यामुळे घटणार साखरेचे उत्पादन

जळगाव : खानदेशातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला आहे. या सर्व कारखान्यांनी शुक्रवारपर्यंत (दि.17) 18 लाख 63 हजार 962 मेट्रीक टन उसाचे गाळप करताना सरासरी 9.1 च्या साखर उतार्‍याने 16 लाख 96 हजार 107 क्विंटर साखरेचे उत्पादन केले. संबंधित जिल्हे मराठवाड्याच्या साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येतात. उसाचा तुटवडा असल्याने यंदा साखर उत्पादनात घट होणार आहे.
उसाच्या तुटवड्यामुळे यंदा अनेक कारखाने मध्य प्रदेशातूनही उसाची खरेदी करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील दोन सहकारी व एक खासगी मिळून तीन साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या तीन कारखान्यांनी चार लाख 39 हजार 356 मेट्रीक टन उसाचे गाळप करीत सरासरी 9.48 च्या उतार्‍याने 4 लाख 16 हजार 577 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील केवळ एका कारखान्याने गाळपात सहभाग नोंदवत 1 लाख 990 मेट्रीक टन उसाचे गाळप करत 9.82 च्या उतार्‍याने 99 हजार 140 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here