साखरेचा ट्रक कामगारांनी अडवला

करमळा: आदिनाथ कारखान्यातील कामगारांचा ४६ महिन्यांचा पगार थकला आहे. त्याच्या मागणीसाठी गेल्या ९ जानेवारीपासून कामगारांनी प्रवेशद्वारासमोर साखळीपद्धतीने उपोषण सुरू केले आहे. याची दखल न घेतल्यामुळे आणि साखर विक्रीची कुणकुण लागल्याने कारखान्यातील साखर घेऊन जाण्यासाठी आलेला ट्रक कामगारांच्या कुटुंबातील महिला व मुलांनी अडवला. तसेच, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे व संचालक मंडळाला घेराव घालत साखर बाहेर जाऊ देण्यास मज्जाव घातला.

शुक्रवारी (ता. २८) उपोषणाचा ५१ दिवस होता. त्याचवेळी कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी अध्यक्ष संतोष पाटील तिथे आले. त्यांनी कामगारांची समजूत काढली. दरम्यान, दरम्यान कारखान्यात दोन ट्रक साखर भरण्यासाठी आले. पण, जोपर्यंत आमचा पगार दिला जात नाही, तोपर्यंत कारखान्यातील काहीही विक्री आम्ही होऊ देणार नाही, असेही या कामगारांनी पदाधिकाऱ्यांना बजावले. तेव्हा रिकाम्या हाताने पदाधिकाऱ्यांना परतावे लागले.

शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे थकले आहेतच. पण, मध्यंतरी तोडगा काढण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण, त्यात यश मिळाले नाही. कामगारांनी साखर बाहेर नेण्याचा प्रयत्न हाणून पाडला. जोपर्यंत रश्मी बागल स्वतः इथे येत नाहीत, पगार देत नाहीत, तोपर्यंत आम्ही काहीच विक्री होऊ देणार नाही, असे
सांगत कामगारांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.

पोलिसांकरवी दमदाटी करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्तापर्यंत वाटोळे केले. पण आता साखर विकून त्यांना लूट करायची आहे, पण आम्ही करू देणार नाही, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब साखरे यांनी
सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here