अहमदनगर: जिल्ह्यातील १३ सहकारी आणि आठ खासगी साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे.
आतापर्यंत ८७ हजार ७२४ टन ऊसाचे गाळप झाले आहे. तर १०.३६ टक्के रिकव्हरी मिळवून श्रीगोंदा कारखाना अव्वल स्थानावर आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २३ साखर कारखाने असून त्यापैकी साईकृपा २ आणि तनपुरे सहकारी साखर कारखाना हे दोन बंद आहेत.
जिल्ह्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांनी ५८ हजार १४९ टन आणि खासगी साखर कारखान्यांनी २९ हजार ५७५ टन ऊसाचे गाळप केले आहे.
Image courtesy of Admin.WS