ऊस बिले देण्यास आहुलाना कारखाना हरियाणात अग्रेसर

83

गोहाना : आहुलाना येथील चौ. देविलाल सहकारी साखर कारखाना ऊस बिले देण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. कारखाना प्रशासाने शेतकऱ्यांना ६०.३५ टक्के ऊस बिले दिली आहेत. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली आहे. बिले देण्यात आहुलाना कारखाना राज्यात प्रथम तर जिंद कारखाना द्वितीय क्रमांकावर आहे.

लेखा विभागाचे मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र शर्मा यांनी सांगितले की, कारखान्यांने १० नोव्हेंबर रोजी गळीत हंगाम सुरू झाला. आता ५३ दिवसझाले आहेत. यादरम्यान १३ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. एकूण ६०.३५ टक्के बिले दिली असून २७ कोटी रुपये २७३५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत. २० डिसेंबरपर्यंत ऊस बिले दिली आहेत.२७ कोटी रुपयांची बिले तीन टप्प्यात दिली आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १११ गावे आहेत. जवळपास ३५०० शेतकरी ५० लाख क्विंटल ऊस उत्पादन करतात. कारखान्याची गाळप क्षमता २५ हजार क्विंटल प्रती टन आहे.

कारखान्यात विज तयार केली जाते. सहा लाख युनिट वीज उत्पादन केले आहे. ती विज महामंडळाला विक्री करण्यात आली. कारखान्याकडून २५ लाख रुपयांच्या विजेची विक्री झाली आहे. कारखान्याचा उतारा प्रती क्विंटल ८.७७ किलो आहे असे दौ. देविलाल सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आशीष वशिष्ठ यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here