ऊस दर प्रती टन ४००० रुपये करण्याची AIADMKची मागणी

चेन्नई : डीएमके आपल्या निवडणुकीच्या घोषणापत्रात दिलेल्या आश्वासनानुसार ऊसाचे किमान समर्थन मूल्य ४००० रुपये प्रती टन करावे अशी मागणी एआयडीएमकेचे समन्वयक ओ पनीरसेल्वम (AIADMK coordinator O PAnneerselvam) यांनी राज् सरकारकडे केली आहे.

प्रसार माध्यमांना त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने ऊसाचे किमान समर्थन मूल्य २९०० रुपये प्रती टन केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. गेल्यावेळी एआयडीएमकेच्या शासन काळात २०१६ मध्ये किमान समर्थन मूल्य २८५० रुपये प्रती टन निश्चित केले होते. त्यावेळई स्टॅलिन यांनी ते वाढवून ३५०० रुपये करावे अशी मागणी केली होती, याची आठवण ओ पनीरसेल्वम यांनी करून दिली. डीएमकेने दरवाढ केली नाही तर निदर्शने करण्याची घोषणा त्यांनी केली होती. निवडणुकीच्या घोषणापत्रात जर पक्ष सत्तेवर आला तर शेतकऱ्यांना ४००० रुपये प्रती टन दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता २९०० रुपये प्रती टनाची घोषणा करून स्टॅलिन यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असे ओ पनीरसेल्वम म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here