श्रीलंकेत साखरेचे उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट : GOPL कडून नव्या कारखान्यासाठी १२ अब्ज रुपयांची गुंतवणूक

कोलंबो : श्रीलंकेत साखर उत्पादनाला चालना दिली जात असून नवीन कंपन्या देशातील साखर क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. यासोबतच Galoya Plantations (Pvt) Limited (GOPL) ने ऊस गाळप क्षमता वाढवण्यासाठी आणि साखर उत्पादनाला चालना देण्यासाठी नवीन कारखान्याच्या बांधकामात १२  अब्ज (श्रीलंकन चलन) ची गुंतवणूक केली आहे. गलोया प्लांटेशन कंपनीचे कार्यकारी संचालक दानेश आबेरत्ने यांनी सांगितले की, राष्ट्रीय ग्रीडमध्ये ८.७५ मेगावॅट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून आम्ही उसाच्या कचऱ्याचा वापर वीज निर्मितीसाठी करू. त्यापैकी 5 मेगावॅट ऊर्जा आमच्या कामकाजासाठी गरजेची असेल. GOPL कंपनीची १५MW विजेची निर्मिती इंगिनियागाला सेनानायके समुद्रया जलाशयातील वीज प्रकल्पाच्या उत्पादनापेक्षा जास्त असेल.

GOPL च्या नवीन कारखान्याची दररोज ऊसाचे गाळप करण्याची क्षमता ४,५०० मेट्रिक टन क्षमता असेल. GOPL ची स्थापना २००७ मध्ये पूर्वीच्या हिंगुराणा शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे पुनरुज्जीवन करून करण्यात आली होती. हा कारखाना १९९७ मध्ये बंद पडला होती. आबेरत्ने म्हणाले की, हिंगुराणा शुगर प्लांटेशनच्या खराब आर्थिक ट्रॅक रेकॉर्डमुळे स्थानिक बँकिंग प्रणालीद्वारे कर्ज मिळवणे सुरुवातीला अशक्य होते. त्यामुळे समूहातील गुंतवणूक वाढली.

ते म्हणाले, कारखाना ताब्यात घेताना आमच्यासमोरील प्रमुख आव्हानांपैकी एक म्हणजे ऊस उत्पादकांमध्ये आत्मविश्वास पुन्हा निर्माण करणे हे होते. शेतकऱ्यांना, पूर्वीच्या व्यवस्थापनाकडून त्यांचा  उत्पादित ऊस खरेदी केला जाईल असे वारंवार आश्वासन दिले गेले होते. परंतु गुंतवणूकदार निघून गेल्याने ते निराश झाले होते. आम्ही त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यांच्यासोबत आधीच ऊस खरेदी करार केला. आज ते उच्च उत्पन्न मिळवत आहेत. काही शेतकऱ्यांनी ऊस पिकवण्यासाठी भातशेतीही सोडून दिली आहे. कारण इथे त्यांना चांगल्या मोबदल्याची हमी दिली जाते. आम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांना १४ अब्ज रुपये दिले आहेत.

दरवर्षी, देशाच्या गरजेपैकी ८७ टक्के साखर आयात केली जाते. फक्त १३ टक्के साखर देशांतर्गत उत्पादित होते. GOPL स्थानिक साखर उत्पादनात सुमारे ३६ टक्के योगदान देते आणि २०२२ मध्ये कंपनीने आपले सर्वाधिक योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here