नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये तालिबानी युगाची सुरुवात झाली आहे. अतिरेकी संघटना ताबिलानने काबुलवर कब्जा केला आहे. काबुल विमानतावरुन कमर्शिअल फ्लाइट्स बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे एअर इंडियाच्या फ्लाइट्स आता काबुलला जाणार नाहीत. एअर इंडियाने फ्लाइटच्या वेळेत बद केला होता. सकाळच्या फ्लाइटऐवजी एअर इंडिया विमान दुपारी साडेबारा वाजता उड्डाण करणार होते. मात्र, एअर स्पेस बंद झाल्यानंतर फ्लाइट रद्द करण्यात आली. तालिबान्यांनी काबुलवर कब्जा केला आहे. काबुलमधून परदेशी नागरिकांसह तेथील लोक बाहेर पडू इच्छित आहेत. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण आहे.
दुसरीकडे काबुलमध्ये हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन सैन्याला इशारा देण्यासाठी हवेत गोळी चालविण्याची वेळ आली. तालिबानने कब्जा केल्यानंतर हताश झालेल्या नागरिकांना तातडीने तेथून बाहेर पडायचे आहे. एका अधिकाऱ्याने जागतिक वृत्तसंस्थेलाही माहिती दिली. जमाव काबूत राहिलेला नाही. तो गोंधळ शांत करण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, अमेरिकन सैन्य विमानतळावर आहे. हे सैनिक आपल्या अमेरिकन दुतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर नेण्यास प्राधान्य देत आहेत. अमेरिकेन सुरुवातीला सांगितले की, आपल्या दुतावासातील कर्मचाऱ्यांना विमानतळावर पाठविण्यात आले आहे.
काबुल विमानतळावर अराजकता आणि गोंधळाची स्थिती आहे. कारण हजारो नागरिकांना अफगाणिस्तान सोडायचा आहे. एका प्रत्यक्षदर्शीने न्यूज वायरशी बोलताना सांगितले की, आम्हाला येथे खूप भीती वाटत आहे. ते केवळ हवेत गोळीबार करीत आहेत. लोक विमानतळाच्या रवनवेर धावपळ करीत आहेत. विमानात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हिडिओ सामोरे आले आहेत. अशा स्थितीत दुतावासातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या अमेरिकन उड्डाणांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे.
दुसरीकडे भारत सरकारनेही काबूलवर नजर ठेवली आहे. एअर इंडियाची दोन विमाने पर्यायी ठेवली आहेत. आपत्कालीन स्थितीत तेथून लोकांना बाहेर काढण्याची तयारी सरकारने केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link