मुंबई : आलोक कुमार वैश्य यांनी वैयक्तिक कारणास्तव कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती बजाज हिंदुस्थान शुगर लिमिटेडने भारतीय शेअर बाजाराला दिली आहे. तर अजय कुमार शर्मा यांना नव्या व्यवस्थापकीय संचालक पदावर (Managing Director) नियुक्त करण्यात आले आहे.
नियमाक फायलिंगमध्ये बजाज हिंदुस्थान शुगर्सने म्हटले आहे की, आलोक कुमार वैश्य यांनी व्यक्तीगत कारणास्तव कंपनीच्या संचालक मंडळातून व्यवस्थापकीय संचालक पदाचा आपला राजीनामा सोपवला आहे. शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आलोक कुमार वैश्य यांना २० मे २०२२ पासून कंपनीच्या सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. बजाज हिंदूस्थानने म्हटले आहे की, आम्ही सांगू इच्छितो की, संचालक मंडळाने २० मे २०२२ पासून व्यवस्थापकीय संचालक पदावर अजय कुमार शर्मा यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली आहे.