आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी १५ जणांचे १७ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ४१ अर्ज दाखल असून शुक्रवारी, दि. १० नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. पहिल्या दोन दिवसांत ‘ब’ वर्ग सभासद गटातून अद्यापही एकही अर्ज दाखल झालेला नाही.

महिला गटातून माजी सभापती रचना होलम यांच्या दोन अर्जांसह एकूण चार अर्ज दाखल झाले. इतर मागास गटातून एक अर्ज दाखल झाला असून अनुसूचित जाती- जमाती गटातून दिनेश कांबळे यांच्यासह तीन अर्ज दाखल झाले. भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्यासह दोन अर्ज दाखल आहेत.

दुसऱ्या दिवशी गट क्र. ५ हात्तिवडे -मलिग्रे गटातून एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र, गट क्र. १ उत्तूर – मडिलगेमधून एक अर्ज दाखल झाला. गट क्र. २ आजरा – श्रृंगारवाडीमधून तालुका संघाचे माजी अध्यक्ष राजाराम होलम यांचे दोन व माजी संचालक विजय देसाई यांचा एक असे तीन अर्ज दाखल झालेत. गट क्र. ३ पेरणोली- गवसेमधून दोन अर्ज दाखल आहेत. गट क्र. ४ भादवण- गजरगावमधून सुधीरकुमार पाटील यांचा एक अर्ज दाखल आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here