ऊस थकबाकी भागवण्या बाबत अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

78

वाराणसी: समाजवादी पार्टी चे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शेतकऱ्यांच्या विरोधाचे समर्थन करुन सरकारवर प्रहार केला आणि मागणी केली की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना पीकांचे न्यूनतम समर्थन मूल्य दुप्पट करावे.

यादव यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करतो. किसान यात्रा रोखण्यासाठी आमच्या नेत्यांना नजरबंद केले जात आहे. मी पंजाबच्या च्या शेतकऱ्यांचे कृषी विधेयका विरोधात मोर्चा काढण्यासाठी अभिनंदन करतो. आम्ही भाजप व्दारा आश्वासन दिलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पिकांचे मूल्य दुप्पट करण्याची मागणी करतो.

ऊस थकबाकी भागवण्या बाबतही अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या सरकारमध्ये सठियांव, आजमगढ़ मध्ये सहकारी साखर कारखान्याची सुरुवात निश्चित केली. परंतु मुख्यमंत्र्यांचे आश्वासन नंतर ही इकडे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची थकबाकी करोड़ो मधे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here