फोर्ब्स रिअल टाईम बिलेनियर इंडेक्स च्या यादीत मुकेश अंबानी सातव्या स्थानावरून नवव्या स्थानावर

नवी दिल्ली: टेस्ला आणि स्पेस एक्स चे प्रमुख 49 वर्षीय एलन मस्क आता जगातील चौथे श्रीमंत बनले आहेत. त्यांची संपत्ती जवळपास 105 बिलियन डॉलर झाली आहे. याप्रकारे त्यांनी फेसबुक चे सीईओ मार्क जुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर इेडेक्स नुसार जगातील टॉप 10 श्रीमंत गुरुवारी दुपारपर्यंतच्या लिस्ट मध्ये एशिया च्या सर्वात मोठया श्रीमंत रिलायंस इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी दोन पायर्‍या खाली जावून नवव्या स्थानावर आहेत.

एलन मस्क यांनी फेसबुक चे सीईओ मार्क जुकरबर्ग यांना एक पायरी मागे टाकले आहे. त्यांच्या नेटवर्थ मध्ये 8.4 अरब डॉलर चा फायदा झाला आहे. तर मुकेश अंबानी सातव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर आले आहेत. आठव्या स्थानावर लैरी एलिशन आणि सातव्या वर लैरी पेज आहेत. वॉरन बनेट सहाव्या आणि मार्क जुकरबर्ग पाचव्या स्थानावर आहेत. अमेजन चे सीईओ जेफ बेजोस यांचे 1.6 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे, तरीही ते पहिल्या स्थानावर आहेत. दुसर्‍या स्थानावर बर्नार्ड एंड फॅमिली आहे. तिसर्‍यावर बिलगेटस आहेत.

फोर्ब्स रियल टाइम बिलियनेयर रैकिंग्स मुळे प्रत्येक दिवशी पब्लिक होल्डिंग्स मध्ये होणार्‍या चढ उतारांबाबत माहिती मिळते. जगातील वेगवेगळ्या भागामध्ये शेअर बाजार खुला झाल्यानंतर प्रत्येक पाचव्या मिनिटाता हा इंडेक्स अपडेट होतो. ज्या व्यक्तींची संपत्ती कुठल्याही खाजगी कंपनीशी संबंधीत आहे, त्यांचे नेटवर्थ दिवसात एकदाच अपडेट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here