अल्जेरिया साखरेवर व्हॅट कर लागू करणार: पंतप्रधान रहमान

241

अल्जेयर्स : पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून सफेद आणि कच्च्या साखरेवर ९ टक्के मूल्य वर्धित कर (व्हॅट) लागू केला जाईल अशी घोषणा अल्जेरियाचे पंतप्रधान अयमान बेनबर रहमान यांनी केली आहे. साखरेची आयात कमी केली जावी यासाठी अल्जेरियाने या उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

ओपेकचा सदस्यअसलेल्या अल्जेरियाने अर्थसंकल्प आणि व्यापारातील तूट दूर करण्यासाठी अन्नधान्य आणि इतर साहित्याच्या आयातीवरील खर्चात कपात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुंषंगाने पंतप्रधान अयमान बेनबर रहमान यांनी संसदेला सांगितले की, अल्जेरियामध्ये दरवर्षी जवळपास २ मिलियन टन साखरेची आयात केली जाते. साखरेचा खप कमी व्हावा असे या व्हॅट टॅक्स लागू करण्यामागील उद्देश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here