लॉकडाउनमध्येही उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पार पडला चांगल्या पद्धतीने: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दावा केला की, राज्यामध्ये कोरोना वायरस मुळे लागू झालेला लॉकडाउन आणि त्यानंतरही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम योग्य पद्धतीने पार पडला. केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याबरोबर कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंडावर एक व्हिडिओ कॉन्फ्रेरन्समध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, लॉकडाउनमुळे पुरवठा शृंखला आणि ऊसतोडीवर परिणाम होवू शकत होता, पण राज्य सरकारने याप्रकारच्या शक्यता रोखण्यासाठी योग्य उपाय केले.

त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशामध्ये ऊस सर्वात महत्वाचे पीक आहे आणि राज्यातील सर्व 119 साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालवले गेले. यावर्षी 1,118.02 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करुन 126.36 लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले. केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, केंद्र सरकारने लॉकडाउन कालावधी दरम्यान कृषी कार्यांना सुट दिली होती, ज्यामुळे कृषी उत्पादन चांगले झाले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here