प्रियांका रेड्डी रेप प्रकरणातील चार आरोपींचा एनकाउन्टर

हैदराबाद: हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले 4 आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे 3 वाजता घडली. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा आरोप या चार आरोपींवर होता.

हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तपासादरम्यान, या 4 आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही थांबवण्यचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या. यात या चौघांचा मृत्यू झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी दिली.

शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या 4 आरोपींची नावे आहेत. या चौघाना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी त्यांना घटनेची माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी नेले. ही घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना तपासायचे होते. मात्र, या दरम्यान या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. चारही आरोपी पळून जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणानंतर या चौघांना फाशी द्यावे, अशी मागणी देशभरातून होत होती.

27 नोव्हेंबरच्या रात्री 27 वर्षीय महिला डॉक्टरवर या चौघांनी अमानुष अत्याचार केले. दारू पिऊन असलेल्या या आरोपांनी महिला डॉक्टर आपली स्कूटी पार्क करत असल्याचे पाहिले आणि त्यांनी आपली योजना आखली. त्यांनी स्कूटीची हवा काढून टाकली आणि मदतीचा बहाणा करून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्यांनी बलात्कार केला आणि गळा दाबून तिची हत्या केली. आरोपी इथवरच न थांबता त्यांनी तिचे शव ट्रकमध्ये लादून टोलनाक्यापासून 25 किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावरून ते खाली फेकून दिले. पहाटे दूधवाल्याने शव पाहून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा अमानुष प्रकार उघडकीस आला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here