ऊस तोडणी यंत्रात बिघाड झाल्याने सव्वा कोटीचे मशीन जळाले

मालेगाव : ऊस तोडणीसाठी कामगार मिळत नसल्यामुळे बर्‍याच साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत. पुर्णा सहकारी साखर कारखान्याकडे पाच ऊस तोडणी यंत्रे आहेत. सध्या या कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. या कारखान्यासाठी कामठा (ता.अर्धापूर, जिल्हा नांदेड) शिवारातील बालाजी स्वामी यांच्या शेतात ऊस तोडणी या यंत्राच्या सहाय्याने सुरु असतांना वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने यंत्राने पेट घेतला व हे यंत्र आगीच्या भक्षस्थानी पडले. या सुमारे सव्वा कोटी किमत आहे.

तसेच यंत्रासोबत ऊसालाही आग लागली. आजुबाजुच्या शेतकर्‍यांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे. प्रसंगावधानामुळे चालक वाचला पुर्णा सहकारी साखर कारखान्याकडे कारखाण्याच्या दोन व खासगी मालकांच्या तीन अशी पाच ऊस तोडणी यंत्रे आहेत.

वाघी (ता.नांदेड) येथील राजाराम नरडीले यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी ऊसतोडणी यंत्र खरेदी केले आहे. चालु हंगामात गेल्या दहा दिवसांपासून ऊस तोडण्याचे काम सुरू आहे. कामठा बुद्रुक येथे ऊस तोडणी सुरू असताना ही घटना झाली आहे. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने शिवप्रसाद नरडीले यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना नांदेड येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी विजय आवरदे, संगमनाथ मुस्तरे, कमलाकर कनगिरे यांनी तातडीने दाखल केले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. यंत्र चालकाने प्रसांगावधान दाखवून उडी मारल्याने त्याचा प्राण वाचला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here