ई-गन्ना ॲपवर मिळणार सर्व माहिती

महराजगंज : कृषीप्रधान महराजगंजमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या ऊस पट्ट्यात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येवू नये यासाठी ऊस विभागाने सर्व्हेच्या अंतिम टप्प्यात ई-गन्ना ॲपचा वापर करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. ऊस विभागाने सांगितले की, ॲपवर शेतकऱ्यांना सर्व्हे, बेसिक कोटा, खाते क्रमांक, कॅलेंडर आदी सर्व माहिती मिळेल. शेतकऱ्यांना अपडेट केले जात आहे.

याबाबत दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव यांनी सांगितले की, ऊस विभागाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी या ॲपची निर्मिती केली आहे. अशात छोट्या शेतकऱ्यांची सर्व माहिती घरबसल्या मिळू शकते. ऊस पुरवठा आणि बिले यांचीही माहिती मिळेल. मात्र, याविषयी जागरुकता नसल्याने शेतकऱ्यांना ऊस विभागाकडे यावे लागते. शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा सामना अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावा लागतो. आता ऊस विभाग शेतकऱ्यांना सर्व त्या प्रकारच्या सूचना ऑनलाईन देवू शकतो. यामुळे घुघली, गड़ौरा, ठूठीबारी, सिसवा, बृजमनगंज येथील शेतकऱ्यांना ऊस विभागाच्या दारात जावे लागणार नाही. शेतकऱ्यांना एका क्लिकवर ई-गन्ना ॲपमधील ही माहिती मिळू शकते. यासाठी शेतकऱ्यांना आपली माहिती द्यावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here