ऑक्टोबरपर्यंत मिळणार सर्व थकीत ऊस बिले : जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

56

शामली : जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी दिन कार्यक्रमात साखर कारखान्याचे पदाधिकारी आणि विद्यूत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यांची सोडवणूक करण्याचे निर्देश संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आले. जर यामध्ये टाळाटाळ करण्यात आली, तर गुन्हे नोंदविण्यात येतील असा इशारा देण्यात आला. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी ऊस बिले थकीत असल्याची तक्रार केली. जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांकडे सुमारे ७०० कोटी रुपये प्रलंबित आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. याबाबत वेळोवेळी शेतकरी नेते, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनेही दिली आहेत. याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व ऊस बिले ऑक्टोबरपर्यंत देण्याचे निर्देश दिले.

दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या शेतकरी दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विजेच्या समस्येचाही मुद्दा उपस्थित केला. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ऊस विभाग आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समस्या वेळेवर सोडवल्या नाहीत, तर त्यांच्याविरोधात एफआरआय दाखल केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here